
BK-१६ जेल डायरी: नव-पेशवाई तुरुंग व्यवस्थेविरोधातलं एल्गार कैद्यांचं बंड – रमेश गायचोर यांच्या जगण्यातून

To mark six years of the arbitrary arrests and imprisonment of political dissidents in the Bhima Koregaon case, The Polis Project is publishing a series of writings by the BK-16, and their families, friends and partners. (Read the introduction to the series here.) By describing various aspects of the past six years, the series offers a glimpse into the BK-16’s lives inside prison, as well as the struggles of their loved ones outside. Each piece in the series is complemented by Arun Ferreira’s striking and evocative artwork. (This piece has been translated into English by Vernon Gonsalves here, and into Hindi by Prashant Rahi here.)
जिन्हें नाज़ है हिन्द पर उनको लाओ जिन्हें नाज़ है हिन्द पर वो कहां हैं ?? या देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या काही वर्षांनंतर लिहिलेल्या साहिर लुधियानवी यांच्या या ओळी आजही भिनल्यात आत. पण आज या शब्दांना या देशातलं नवपेशवाईचं सरकार कशा पद्धतीने घेईल आणि साहिरसारख्या कवी, गीतकारांचं काय करेल ? कदाचित त्यांनाही या देशाच्या जमिनीवरील काही एकर जागा निवडून त्यावर बांधल्या गेलेल्या उत्तुंग महाकाय अभेद्य भिंतींआड, कडेकोट सुरक्षाव्यवस्थेतल्या चोवीस तास नेमेलेल्या पहाऱ्यात आणि बंदुका, लाठ्या, पट्टे उपलब्ध केल्या गेलेल्या जागेत आणून ठेवेल. या देशात जिथे संविधान, लोकशाही, मानव अधिकार, समता, मानवीयता अशा गोष्टींचा बोलबाला आहे; तिथे या भिंती उभारून खाकी गणवेशाचा म्हणजेच पोलिसी दंडेलशाहीचा दरारा असलेला दबावयुक्त माहोल नियोजनपूर्वक बनवलाय. आणि सुरू केलाय एक सरकारी व्यवस्थापुरस्कृत खेळ, मानव अधिकारांच्या पायमल्लीचा. मानवासोबतच्या अमानवीय वागणुकीचा. निर्दोष व्यक्तीच्या स्वाभिमानाला पावलोपावली चिरडण्याचा. किमान माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक गोष्टींपासूनही व्यक्तीला वंचित ठेवण्याचा. माणूस असूनही जनावरागत जगण्यास भाग पाडल्या जाण्याचा. आणि या अशा असंविधानिक, बेकायदेशीर, हुकूमशाहा व्यवस्थेबाबत…
Related Posts


Donald Trump’s Master Economic Plan I Opinion by Yanis Varoufakis
